कडप्पा – KADAPPAA


प्रीतीने भर भर ओटी
वंदन दुहिते शत कोटी

संथ वाहते संत मती
नितळ वाहती नीर गती

कांचन पाचूच्या मखरी
पदर भरजरी निळी निरी

काष्ठ स्तंभ दो कळस शिरी
हिरवळ भूवर मुक्त सरी

मुखचंद्रावर तेजस्वी
भाव मनोहर ओजस्वी

सरळ नासिका कृष्ण कळी
काया झळझळ सोनसळी

काळ कडप्पा उंबरठा
मित्र जिवाचा पाणवठा

सजल नेत्र घन भाव पहा
चरणी कुंकू हळद वहा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.