लुगडे सारी पातळ शालू अंबर डेपो रे
पदर हवायिन काठ भरजरी झुंबर डेपो रे
तवंग कचरा पाण्यावरती डासांची अंडी
बंद कालवे उघड दावण्या डिम्बर डेपो रे
कृष्ण कडप्पा तांबड गडवा जांभरत्न किरीट
गुलाब झेंडू रजनीगंधा टिम्बर डेपो रे
नांदरुकी वट पाकर पिंपळ वृक्षांवर पक्षी
उदूंबराच्या वृक्षतळी फळ उंबर डेपो रे
कृष्णे तीरी ग्राम बावची कात्यायनि देवी
खिरा काकडी वाळुक गोड कुकुम्बर डेपो रे
किणकिण मंजुळ रव कुरणांवर गाय वासरांसह
हृदयामध्ये वात्सल्याचा हंबर डेपो रे
हप्ते महिने वर्षे सरली ना धुतल्या टाक्या
गाळ घाण तळ दावायास दिगंबर डेपो रे
पेकट मजबुत कमर घागरी नाजुक सिंहकटी
मम गझलांची जमीन कसण्या कंबर डेपो रे
लग्न बारसे शांत वास्तुची कैक नव कारणे
मिथ्य रुढींना पोसे हा अवडंबर डेपो रे
हप्ते महिने वर्षे सरली ना धुतल्या टाक्या
गाळ तळीचा उपसायाला प्लम्बर डेपो रे
देवनागरी लिपीत हिंदी नववा हा महिना
दिवस भराया मात्रा अचुक सितंबर डेपो रे
सैलपणाने नकाच बोलू इथे तिथे कोणी
सैलपणाला टाचायास नवंबर डेपो रे
नको कुणा सवलती फुकाच्या खैराती उधळू
वासुपूज्य घट तोलायास दिसंबर डेपो रे
चला करू संक्रांत साजरी नववर्षामधली
शांति लाभण्या कवी मना अवदुंबर डेपो रे
गुलाब जाई जुई मोगरा बकुळ चमेलीचे
कुपीत अत्तर भरावया पैगंबर डेपो रे
नेम सुनेत्रा संगणकाला चिटणिस विश्वासू
अक्षर मात्रा जुळवायाला नंबर डेपो रे