भरुन शेण मी सुधारलो ना बाप सायबा
कोरोना की म्हणू करोना बाप सायबा
डबल डबल म्या टीप मारुनी टाच लावली
कसा फाटला चुकार कोना बाप सायबा
शेतकरी मन उदासवाणे कधीच नसते
म्हणत जाय ते होला होना बाप सायबा
भांप बाष्प की वाफ म्हणावे गरम हवेला
प्रश्न जिरवतो विचारतो ना बाप सायबा
ग़ज़ल गुरू तो पढवून गेला महत्त्व मक्ता
रत्नत्रय कोंदणी सुनेत्रा बाप सायबा