संकेत बारकावे पाळून शोध घ्यावा
इच्छांस त्रासदायक भागून शोध घ्यावा
तृप्ती उडून जाता पाडून छिद्र वस्त्रा
हुरहूर करुन मोठी फाडून शोध घ्यावा
झालाय प्राण गोळा पाऊल उचलताना
लय ताल सूर ठेका गुंफून शोध घ्यावा
झाले फिके फिके जर नवरंग लोचनांचे
दृष्टीतले निखारे फुंकून शोध घ्यावा
मम नाव अर्थ रुपये अब्जावधी “सुनेत्रा”
खात्यात सहज टिकण्या कोळून शोध घ्यावा