सर्किट – CIRCUIT


सळसळ ..
उकल उखळ वा मुसळ असूदे
नयनी सलते कुसळ असूदे
लिहिण्यासाठी वेळ किती मज
लिहित राहते सळसळ असूदे
…..

अवघडलेल्यांना ते अवघड
सोप्यांमधले सोपे अवघड

चित्र शिल्प काव्यासम सर्किट
जड बुद्धीला वाटे अवघड

उघडे पडता पितळ तयांचे
त्यांचें त्यांना झाले अवघड

ग्राहक राजा आला दारी
नकोच मोजू पाने अवघड

लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते
सहज लीलया गेले अवघड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.