झिनर – ZENER


आम असुनी खास सुद्धा..  झिनर आहे
अर्धवाहक इन्स्ट्रुमेंटल .. विनर आहे

घे अता तू झेल भावा बघत वरती
लेक माझा रत्न खाशी .. स्पिनर आहे

जा तिथे तू सांज समयी गात गाणे
लेक सुगरण बोलवी तुज .. डिनर आहे

ऐकते बघ बोलगाणी पुण्यनगरी
बोलणारी नात मम ना .. सिनर आहे

वाळता कापूस बोन्डे यंत्र मानव
वेगळी सरकी कराया.. जिनर आहे

मयत प्राणी मृत तरुंची सोलुनीया
कातडी कमवे सहज ते.. स्किनर आहे

धान्य साठवणूक करण्या सालभरची
बनवितो मजबूत पिंपे .. टिनर आहे

दर हमी माजी झऱ्यासम जैजयाजय
गझलियत मी जलद धारा इनर आहे

गालगागा तीन वेळा लिहित विणते
मी “सुनेत्रा नेक पदरी .. थिनर आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.