Tag: Ghazal in maatraa vrutta

  • मी इळभर लिवले शिवले – MEE ILABHAR LIVALE SHIVALE

    मी इळभर लिवले शिवले पर कागुद चिंधी झाला ती उनाड मैना कावुन शबुदाचा करती काला त्यो पान खाउनी थुकला मी हुशार हाये म्हणला मंग मीबी बोल्ले लिवरं त्यो चघळत बसला पाला म्या कायबाय गिरगटलय त्ये चिडलं तरिबी हासतय खट दाजी सरकिट येडा अन खासा दिसतुय साला गझलच्या जिमीनीमंदी मिरचीचा वाफा सजला ये तोडू लवंगि मिरची…

  • ती साद माउची येता – TEE SAAD MAAUCHEE YETAA

    ती साद माउची येता थरथरली काया सुंदर गझलेच्या वृत्तामधुनी सळसळली काया सुंदर जो उपजत फुलून आला तो अभिनय खराच होता श्वासाला रोखुन धरता झरझरली काया सुंदर भावना दाटुनी आल्या लेखणी हरवली होती पण जवळ संगणक बघुनी टपटपली काया सुंदर वादळी रात अवसेची घनमाला पिसाटलेल्या त्या रात्री वीज बनोनी लखलखली काया सुंदर मी फक्त ‘सुनेत्रा’ आहे…

  • सोनार कुशल मी झाले – SONAAR KUSHAL MEE ZAALE

    सोनार कुशल मी झाले दागिन्यात मढण्यासाठी अन पाथरवटही झाले मूर्तीस घडविण्यासाठी धगधगत्या ज्वालेमध्ये काहिली तनूची होता मी रान जिवाचे केले पावसात भिजण्यासाठी दगडाच्या भावामध्ये विकताना पाहुन रत्ने मी रत्नपारखी झाले अंगठ्या बनविण्यासाठी घामाने शिंपित गेले कागदी मळा काव्याचा थंडीत बोचऱ्या फिरले घामास जिरविण्यासाठी मज घाम पुसायालाही सवड ना मिळाली जेव्हा ते निरखित मज बसलेले दोषांना…

  • घन तोडे कनक कळ्यांचे – GHAN TODE KANAK KALYAANCHE

    घन तोडे कनक कळ्यांचे हातात सखीच्या सुंदर जणु कळ्या जुईच्या पिवळ्या गजऱ्यात सखीच्या सुंदर पाण्यावर शीतल निर्मल दो भावकळ्यांच्या वाती लखलखत्या दीपक ज्योती नयनात सखीच्या सुंदर गझलेतुन सळसळणारी श्वासातुन दरवळणारी प्रीतीची अमृतगाथा हृदयात सखीच्या सुंदर ती हसते तेव्हा गाली रुततात गुलाबी मोती कुंडले जपेची डुलती कानात सखीच्या सुंदर तू सांगशील का आता तव हृदय चोरले…

  • रत्नांच्या खजिन्यामधले – RATNAANCHYAA KHAJINYAA-MADHALE

    रत्नांच्या खजिन्यामधले मी रत्न अलौकिक बाई मम पुत्ररत्न झळझळते खणखणते पौरुष आई ही कन्या सात्विक माझी जणु माधुर्याची पुतळी बघ सान असोनी बनली वाटण्यास सौरभ ताई त्या आखिव गावामध्ये मूढांना पाणी पाजे तो भाऊ माझा तगडा आहेच अतिवीर भाई तोलण्या गुणांना दैवी ती सत्त्वपरीक्षा देते तेलात उकळत्या पडते ही इवली नाजुक राई पाण्यात पाहुनी मजला…

  • पद्मावति – PADMAAVATI

    नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या, पद्मावतिचे,…

  • माय मऱ्हाटी – MAAY MARHAATEE

    माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला बंगालीचा पावा मंजुळ कटुता तुळु विसरे मल्याळीही  संगे म्हणते जेवा आम्हाला प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा आम्हाला…