शास्त्रात घोळ कोठे शोधा बरे दमाने
योगात टोळ मोठे शोधा बरे दमाने
शेरा न मोल तोटे शोधा बरे दमाने
गझली अकोळ गोठे शोधा बरे दमाने
घटना जरी कळाली घटनेत घट पटाचा
गावी मुधोळ लोटे शोधा बरे दमाने
गागागागा लगा लगागा आहेच दोन वेळा
देहास खोळ बोटे शोधा बरे दमाने
जुल काफिया ग सवती आहे इथे “सुनेत्रा”
शब्दात झोल सोटे शोधा बरे दमाने