अबोल प्रीती- ABOL PRITI


जणू कहाणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती!
जशी विराणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती!

तुषार उडवुन नयन भिजविण्या, सुगंध मिश्रित जल भरलेली,
गुलाबदाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती!

घुमत रहाणे जयास भावे, उदास ऐसा कपोतसुद्धा,
म्हणेल गाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती!

अतिशय ज्याला म्हणतिल जैनी, असेच काही घडेल सुंदर,
जळेल पाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती!

अतीशहाणे करतिल नाटक, नको बहाणे, म्हणतिल वेडे,
किती शहाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती!

वृत्त- ल गा ल गा गा, ल गा ल गा गा, ल गा ल गा गा, ल गा ल गा गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.