गुरू पौर्णिमा झाली आज
धन्य जाहला वाली आज
दिवा लाविता जिनालयात
शांत भासते काली आज
धूप जाळता प्रहरी दोन
सुरात स्वर लय ताली आज
भरली रक्षा दाणेदार
न झरले आसु गाली आज
अंक अक्षरांचा बघ खेळ
किती बदलल्या चाली आज
असल्या खेळा उखडुन टाक
रक्षण करण्या ढाली आज
जिनेश्वरावर श्रद्धा ठाम
इगो उतरला खाली आज