इलाज – ILAAJ (MEDICATION)


वाळलेली शुष्क पाने लटकलेली
कोवळी प्रासुक उन्हाने बहरलेली
झिंगलेली गझल साकी बघ सुनेत्रा
आम्रतरुवर गात गाणे झोपलेली
…

मयुरपिसारा हरिणी पाडस
धवल लाल पुष्पांची पखरण
हिरवाईने सलज्ज काया
मात्रा माझ्या इलाज औषध
…

जर्द लाल जर्बेरा आणिक धवल पीत कुसुमांची वर्दळ
हिरवाईचे वसन लपेटुन ऐके पानांची मी सळसळ
अक्षर ओळी पाठवलेल्या पत्रामधुनी आठवतिल ग
सई तुला मम सयीमधूनी जाणवेल वाऱ्याची झुळझुळ
…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.