पूर्ण खात्री जाहली आहे मनाची सिद्धता पण
पूर्ण शांती जाहली आहे मनाची सिद्धता पण
हे पहा आम्ही उभे ठोकून कलमे सामन्याला
पूर्ण गोडी जाहली आहे मनाची सिद्धता पण
सत्य असते निश्चयाने चोख व्यवहारासही घन
पूर्ण पृथ्वी जाहली आहे मनाची सिद्धता पण
शेर चित्रातील सच्चा आणि अच्छा जाण मर्दा
पूर्णता ई जाहली आहे मनाची सिद्धता पण
पंचमेरू की सुमेरू अन्नदाते ऐतिहासिक
पूर्ण नेमी जाहली आहे मनाची सिद्धता पण
ना कुणी रोखेल वेगा वाट ही सोपी सरळ
पूर्ण समई जाहली आहे मनाची सिद्धता पण
या खरे कारण पुणेरी मावळातील खास बघण्या
पूर्ण जाळी जाहली आहे मनाची सिद्धता पण