मुक्तक … कोण
कोण पडत्यात कळले बाई
कोण रडत्यात कळले बाई
मी कश्याला रडावे सांगा
कोण सडत्यात कळले बाई
गझल .. कितीजण
कोण पळाले कळले कळले
कोण कसाई टळले कळले
गा गा ल ल गा म्हणत राहता
कोण बरे हळहळळे कळले
रंगवलेल्या वाड्यामध्ये
कोण कितीजण चळले कळले
बात कशाला सांगू कसली
कोण जुगारी ढळले कळले
सत्य ‘सुनेत्रा’ अस्सल कळता
कोण खरे सळसळले कळले