ग्रंथ चेहरा – GRANTH CHEHARA


ग्रंथ चेहरा भिंत बोलकी आभाळ सजल घन कृष्ण फळा
धुंवाधार जलदांतुन मोती गाळिव जल धारोष्ण झळा

अक्षरगण अन मात्रा वृत्ते ना पोरखेळ ही गझल विधा
गझलियतेवर तरे लीलया तन तहानलेला हरित मळा

शब्दकोश मम मुक्त उधळुनी भरून वाहते कोषागार
ओंजळ सांडे करकमलांची लागल्या जिवा निर्मिती कळा

निःकाचित कर्मे जाळाया ध्यानाग्नीने पेटव समई
धर्म अहिंसा संयमात रम लागाया त्याचा तुला लळा

पुण्य आणखी पुरुषार्थाने मिळते धन दौलत शांती सुख
मोक्षपथावर दृढ सुनेत्रा रचत गावया जिन स्तुती गळा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.