घुमट – GHUMAT


हृदय गर्भात रत्नत्रय झळझळाया भरुन धर कलशास करकमली
वसे शासन जिनांचे पूर्ण ब्रह्मांडी खिरे वाणी त्रिदल कमली

नको रोखूस श्वासाला नको चुकवूस नजरेला भिडव नेत्री
भिजाया चिंब प्रतिबिंबी नयांच्या दोन धारांनी नयन कमली

निळ्या नक्षत्र वाटांनी बरसता माळ वैशाखी झळा गात्री
झरे संगीत लहरींचे रसा माळेत ज्वालांच्या सलिल कमली

ऋतूंचे सोहळे साही टिपाया नयन आतुरले जलद झरले
वसंती ग्रीष्म वर्षा शरद हेमंती लुटे सोने शिशिर कमली

मनगटावर करांच्या रंगमंची तूच कर नाटक भरे घटिका
गुमट वा घुमट त्याच्या तीन काट्यांसह गरगराया समय कमली

रवी अन सोम ग्रह तारे शनी मंगळ गुरू गगनी फिरे कक्षी
बुधा दे हात शुक्राला खराटा धूमकेतूचा घुमव कमली

जिनायतनी जिणेंद्राचीअधर मूर्ती दले अर्धोन्मिलित नेत्री
रजत बकुळी कथा सांगे चतुर्वेदीवर उभ्याने अधर कमली

वसन लेऊन तारांगण दिशांचे दश सहा वा चार समयांसह
जिनालय अवतरण तारण अधिक ज्येष्ठी कला चंद्रार्क नभ कमली

न एकाकी न दुर्दैवी खरा क्षत्रिय ‘सुनेत्रा’ पुत्र गुंडा हा
हिरा झळके स्वतेजाने सुखांना लोळवायाला चरणकमली

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.