दरवळणारी बकुळ चमेली सुंदर भारी
तसा तुझा मुखचंद्र रुपेरी सुंदर भारी
दिली जरी मी कैक जुनेरी सुंदर भारी
दिलास मज तू टोप पुणेरी सुंदर भारी
जशी अचानक सर वळिवाची येते दारी
तशी करे बोहारिण फेरी सुंदर भारी
गुलाब गाली फुलता माझ्या लाल टपोरा
फळे तुझ्या अधरांवर चेरी सुंदर भारी
अता विसावा घेच सुनेत्रा तू घटकाभर
नकोस उचलू दगड घमेली सुंदर भारी
वृत्त – ल गा ल, गा गा, गा गा गा गा, गा गा गा गा.