अभंग ओवी ….. तंदुरुस्त
पाप पुण्य लोप कर्म निर्जरेने
होऊदे तो जेंव्हा व्हायचा असेल
तनमन जपण्या राहू तंदुरुस्त
जीव जीवासाठी घालतात गस्त
प्रत्येकाची व्याख्या मोक्ष मुक्तीची हो
असावी निराळी पंचम या काली
वाम नवं तारू उजव्या तटाला
सुखरूप येता सदाचारी शांत
पुत्र वामादेवी तुझा प्राणप्रिय
अश्वसेन पिता शोभतो क्षत्रिय
क्षेत्रपाल रक्षे भूमी इंच इंच
सुखे तर पालवी खरी हरितकंच
पद्मावती देवी मूर्तीमंत आहे
जिनवाणी माय म्हणते सुनेत्रा