नाजुक सुंदर फूल मृत्तिका
जिनचरणीची धूळ मृत्तिका
पुष्पांना नवरंग द्यावया
तीन विटांची चूल मोगरा
धूरच नाही ऐसे वाहन
त्या गाडीचा रूळ मृत्तिका
किरणांमधुनी धबाबणाऱ्या
वाग्देवीचे मूळ मृत्तिका
पद्मावतिची लेक ‘सुनेत्रा’
तोलत आहे तूळ मृत्तिका
मात्रा वृत्त (८+८ = १६)