विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू
रुमालास करतेस जल गाळणी तू
पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे
तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू
जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे
कळायास संदर्भ झटक मांडणी तू
घरातील खोल्या कवाडे किती ते
जरा लक्ष घालून खडा हो झणी तू
सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी
स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू