कती
स्पष्ट बोल खटकती झोंबती
जर्द कती लाल ती अलक ती
गोष्ट न अलना गझलच लिहिली
ओवाळुन आरती कनक ती
गझल
घड केळ्यांचा विकत मिळाला
घडावरी घड फुकट मिळाला
सवलत खासच बिग बाजारी
भरून गाडी माल मिळाला
बिगी बिगी कुणबिणी निघाल्या
त्यांना लावण जॉब मिळाला
तिखट कटीवर बरणीमध्ये
मम चालीला ताल मिळाला
सूर ताल लय धरून ठेका
गझलियतेला न्याय मिळाला
अलामतीची ओळख अस्सल
पटली हृदया दाम मिळाला
पुण्यवान मी जिनानुयायी
णमोकार मज मंत्र मिळाला
शब्दार्थ
कती ..गोष्ट ,कथा
अलक ..अति लघुत्तम कथा
अलना .. अति लघुत्तम नाटक