जलद गतीने जलद बरसले
जलधर गगनी गाली हसले
कडाडताना वीज नभांगणि
ढग घन लोभी का खेकसले
मुसळ घुसळती पाऊस धार
जणु कोसळते कंटक धसले
जिनालयाच्या कलशामध्ये
पद्माग्नीचे धन रसरसले
भलेभले जनवारी धारक
असे कसे दलदलीत फसले
कुंडीमधल्या मनीप्लांटला
कोरफडीचे घनमूळ सले
ओळख पाहू तूच सुनेत्रा
कोण तरकले कोण तरसले