कुणी फुंकले कान कुणाचे कोणासाठी ..
कुणी फुंकले रान कुणाचे कोणासाठी…
कुणी फुंकले भान कुणाचे कोणासाठी..
कुणी फुंकले प्राण कुणाचे कोणासाठी…
कुणी फुंकले पान कुणाचे कोणासाठी..
कुणी फुंकले बाव कुणाचे कोणासाठी …
फुका लाटुनी गोल चढावे अव्वासव्वा ..
कुणी फुंकले दान कुणाचे कोणासाठी …
असे कोणते कर्म कराया देशासाठी..
कुणी फुंकले वाण कुणाचे कोणासाठी …
भराया हवा ओढत सारे ताणेबाणे..
कुणी फुंकले नाक कुणाचे कोणासाठी…
असो आकडे सात नऊ वा बारा तेरा..
कुणी फुंकले स्थान कुणाचे कोणासाठी…
कधी जायचे खेळ धराया ब्रह्मांडाचा ..
कुणी फुंकले प्रश्न कुणाचे कोणासाठी…
कुठे पाहुण्या शांत “सुनेत्रा” कर्त्या धर्त्या ..
कुणी फुंकले गाव कुणाचे कोणासाठी …