प्रेम माझे फूल आहे;
पारदर्शी कूळ आहे.
भाकरीचा चंद्र भाजे,
पेटलेली चूल आहे.
बहरणाऱ्या वृक्षवल्ली;
बी-बियाणे मूळ आहे.
भावनेची नेत्रभाषा;
नियम आहे रूल आहे.
घाव घाली जे मुळावर;
शस्त्र कसले टूल आहे.
प्रीत-काव्ये चुम्बिणारी;
पाकळ्यांची झूल आहे.
मागुनी मी घेतलेला;
शब्दवेडा शूळ आहे.
सागराचे दो किनारे;
जोडणारा पूल आहे.
पौर्णिमेच्या चांदण्यांची;
बरसलेली भूल आहे.
विरघळे तो बोलण्याने;
ऊस माझा गूळ आहे.
सांडणाऱ्या मोतियासम;
हासणारे मूल आहे.
पिंक नाही ती झऱ्याची;
प्राणदायक चूळ आहे.
वेळ सांगे हात देई;
इंजिनाचा रुळ आहे.
प्रेमिकांनी घेतलेले;
एक सुंदर खूळ आहे.
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा.