तीन मुक्तके …
१) सांडगा ..
नाक सांडगा आहे काय
भाव लांडगा आहे काय
कोण सांगतो गोष्टी चार
ग्रंथ दांडगा आहे काय
२) यान ..
यान टोणगा टांगा बग्गी असो काही पण
म्हैस भरवसा कधी न ठेवे दिसो काहीपण
किती जरी भडभडून आली सोंगे तरीही
झडती घेण्या येतिल पोलिस नसो काहीपण
३) भुरके ..
भुरके घेण्या ताक कण्या देते
भातावर लिंबू पिळण्या देते
श्रावणात मी वेळ छान जाण्या
लाह्यांचे लाडू वळण्या देते