माझं घर – MAZA GHAR(MY HOME)


माझं घर माझं घर
घरासमोर डोंगर

माझ्या घरात शांतीचा
आहे कायम वावर

आम्ही दोघे लेकासंगे
सदा सुखात अपार

लेकीप्रमाणेच लेक
व्यवहारा चोख नेक

सुवर्णाची रास नाणी
माझं घर सोळा खणी

माझं घर माझं घर
माझ्या लेकीचं माहेर

माझं घर माझं घर
माझ्या नातीचं आजोळ

जावयाच्या संगे येई
नात आणि लेक बाई

माझ्या घरात गोकुळ
ज्ञानीयांची पायधुळ

माझं घर माझं घर
समाधानाचं आगर

माझं घर माझं घर
गोठ्यामंदी गाई गुरं

साता समुद्राच्या पार
माझ्या घराचा व्यापार

माझ्या घरी अंगणात
जाई जुई खेळतात

माझं घर माझं घर
नाचतया धारेवर

माझ्या घरात लेखणी
जणु नात शोभे गुणी

माझं घर माझं घर
वारा वाहे घरभर

माझ्या घरी सरस्वती
लक्ष्मीसंगे धन्वंतरी

गुणीजनांचा राबता
माझ्या घरी धर्म वसा

शुद्ध अन्न हवा पाणी
रचण्यास गोष्टी गाणी

सुनेत्राच्या अक्षरांत
ओवी हसतेय गात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.