माझे स्वतंत्र गाणे – MAZE SWATANTRA GANE (my song of freedom)


गाऊन मी लिहावे माझे स्वतंत्र गाणे
रंगात चिंब न्हावे माझे स्वतंत्र गाणे

भय वासना कशाला? मिटवून प्रश्न आता
प्रेमात विरघळावे माझे स्वतंत्र गाणे

गावोत पाखरे अन फुलपाखरे उडावी
त्यांच्यापरी झुलावे माझे स्वतंत्र गाणे

मम शब्द नाचणारे फुलवोत भावनांना
मौनासही कळावे माझे स्वतंत्र गाणे

प्राशून स्नेह प्रीती फुलवात तेवताना
उजळून लख्ख जावे माझे स्वतंत्र गाणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.