बघ निळे आकाश त्यातिल मेघ हे
स्वच्छ या पाण्यावरी नाव तरते
मुग्ध बाला गुणगुणे धुन अक्षरी
बिंब पाचू नीलकांती झुळझुळे
गीत कुठले छेडुनी गात आहे
सांग कुठली मधुर बोली बालिके
ऐकलेले आठवेना बोल हे
गा सुखाने मुक्त गाणे मोकळे
ताल ठेका हात देती दोन हे
द्यावया संगीत गझले छानसे