मौन सोड तू, फक्त एकदा;
करावया मज, रिक्त एकदा.
होउन पुन्हा, तप्त एकदा;
जिंक मुला तू, तख्त एकदा
सैर कराया आभाळाची;
व्हावे म्हणते, गुप्त एकदा.
लढावयाची, ना भीती मज;
पुन्हा सांडते, रक्त एकदा.
नेत्रांमधुनी, हृदयी ये तू;
होइन पुन्हा, भक्त एकदा.
मौन सोड तू, फक्त एकदा;
करावया मज, रिक्त एकदा.
होउन पुन्हा, तप्त एकदा;
जिंक मुला तू, तख्त एकदा
सैर कराया आभाळाची;
व्हावे म्हणते, गुप्त एकदा.
लढावयाची, ना भीती मज;
पुन्हा सांडते, रक्त एकदा.
नेत्रांमधुनी, हृदयी ये तू;
होइन पुन्हा, भक्त एकदा.