पर्ण दोन झळकतात जोडवी किनार दो
चरण कृष्ण उमटतात पावले जलात दो
मूर्त स्वरुप भावभोर सावळी जमीन ही
धरण इंद्र बांधतोय जांभळ्या सुरांवरी
गाल गाल गालगाल गालगा लगाल गा
गालगाल गालगाल गालगाल गालगा
हीच रे लगावली किती सुरेल भावना
आवडेल का तुला नवीन गझल लोचना
साधनेत पूजनात दंगलेत जीव हे
प्राकृतीक मंदिरात शिल्प ना घडीव हे