काय आहे सांग हे
पाडताती भांग हे
वाजती घण्टा कुठे
कोण फेडी पांग हे
काम कसले सोडुनी
मारताती टांग हे
कैक आले कोंबडे
मस्त देती बांग हे
फेसबुकवर यावया
आतुर ग विकलांग हे
दर किती ठरवून घे
देव दानव चांग हे
पायऱ्यांना टाळण्या
टाकताती ढांग हे
क्षेत्र राजस्थानचे
कैक म्हणती डांग हे
केवढ्या मोजू चुका
बघ ‘सुनेत्रा’ वांग हे