राऊळाची वाट सुंदर नि सोपी
कैवल्य चांदणे खिरे घनातून
घाटातून वाट चढत जाऊया
डोंगरी निर्झर खळाळे बागडे
पुण्याची शिदोरी सोडून वाटून
खाऊ घास घास आनंदाने
ओंजळीने पाणी पिऊन तहान
भागेल खरेच चला पुढे जाऊ
राऊळ दिसले हात जोडले मी
कळस झळाळे सूर्य किरणात
चंद्रकोर बीज गगनात आली
अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा
राऊळी गाभारा घंटेचा निनाद
मंजुळ रव तो घुमे हृदयात