कशास काढू उणीदुणी मी
कशास नसती धुवू धुणी मी
लगावली मृदु लगालगागा
कशास झिंगू झिनी झिणी मी
कुलूप किल्ल्या करास माझ्या
कशास धुंडू तयां खणी मी
सुनेत्र माझे सुवर्ण सम्यक
कशास गुंतू सरळ फणी मी
कुरण हवेली दवारलेली
कशास झाडू कुडा रणी मी
स्तुती जिनांची लिहू सुनेत्रा
कशास मिथ्या विणू विणी मी