स्नान -SNAAN


उन्हाच्या फुलांचे थवे स्नान करण्या
इथे रोज येती उदक पान करण्या

कुठे काय कैसे कशाला कुणाला
असे प्रश्न का हे कनक दान करण्या

मुक्या भावना तव नको कुस्करू रे
बळी तेच देतील सोपान करण्या

ढगांचा विजेचा नभी खेळ रंगे
तुझे पावसा नित्य गुणगान करण्या

प्रमाणात केले तरी कैक फाटे
कळ्या पाकळ्यांना अधिक सान करण्या

श्रुताची म्हणे पंचमी आज आहे
तसे पान कोरे नसे यान करण्या

अहंकार हा की लढा संपवेना
कुणी आज यावे नजर म्यान करण्या

खरे काय समया तुझे नाव गाळुन
किती शेर मोजू जिना ध्यान करण्या

लिहू काय मक्त्यात आता भरीचे
‘सुनेत्रा’ जिवाचे पुन्हा रान करण्या

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.