स्वर्गीय सावळे मंदिर श्रावण
आभाळ पेलते संगर श्रावण
झोकात चालल्या ललना मोहक
घाटात पाहण्या झुंबर श्रावण
सांजेस सावळी पणती तेवत
कानात बोलते मंतर श्रावण
श्रद्धेस, आंधळ्या, नजरा डसता
अंधार फोडतो कंकर श्रावण
ज्येष्ठात रंगता गायन वादन
आषाढ संपता नंतर श्रावण
वृत्त- गा गा ल, गा ल गा, गा गा, गा गा.