आत्म परीक्षण करण्यासाठी – AATM PARIKSHAN KARANYAASAATHEE (for taking self test)


आत्म परीक्षण करण्यासाठी दिवस आजचा पुरेलका
आत्म परीक्षण करण्यासाठी नयनी पाणी भरेलका

जगण्यासाठी हवेच मीपण मरण्यासाठी कर तू तू
आत्म परीक्षण करण्यासाठी इतुके मीपण पुरेलका

तर्क लावुनी मिळेल उत्तर असेल जर तो प्रश्न खरा
आत्म परीक्षण करण्यासाठी प्रश्न उत्तरी झरेलका

जिंकशील जर करुन परीक्षा दुसऱ्यांमधल्या न्यूनांची
आत्मपरीक्षण करण्यासाठी आज अहंपण हरेलका

अर्थ जाणण्या आत्मबलाचा नाम शक्ति हे पूर्ण नसे
आत्म परीक्षण करण्यासाठी सत्य शिवाला वरेलका

मात्रावृत्त (८+८+८+६=३०मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.