टोक गाठुनी आलो आम्ही पारसनाथाचे
टोक गाठुनी झालो आम्ही पारसनाथाचे
भक्त पातले सम्मेदावर घागर घेवोनी
टोक गाठुनी न्हालो आम्ही पारसनाथाचे
रंग उधळुनी संधीकाली सूर्यकिरण हसता
गंध चंदनी प्यालो आम्ही पारसनाथाचे
वस्त्र किरमिजी रंगबिरंगी घेउन मेघांचे
टोक गाठुनी ल्यालो आम्ही पारसनाथाचे
पायताण पायात नसूनी चढलो भरभर वर
टोक गाठुनी आलो आम्ही पारसनाथाचे
गझल – अक्षरगण वृत्त – मात्रा २६
लगावली – गालगा/ लगागा/ गागागा/गागागा/गागा/