In this Ghazal, in the first SHER, poetess asks ‘GOD’ to agree that he had taken her examination or tested her unknowingly.
घेतलीस तू छुपी परीक्षा कबूल करना
मान्य तुला जर माझी शिक्षा कबूल करना
माझ्याइतुके कुणी न तुजला कधी वाचले
मी केलेली खरी समिक्षा कबूल करना
मार्ग तुझाही मुक्तीदाता असूनसुद्धा
आवडली गझलेची कक्षा कबूल करना
वाटेवरती खळगे थोडे असणारच रे
कडमडली पण तुझीच रिक्षा कबूल करना
गुलाब-पुष्पावर दवबिंदू तशीच मीही
बनून काटा करशिल रक्षा कबूल करना