क्षमा भाव गुण – “The virtu of forgiveness”


जास्वंदी की जपा म्हणू मी
कुक्षी की कुंडले स्मरू मी

रंग गुलाबी केसर कणकण
बीज मण्यांना कसे धरू मी

कणकण वाटे तुज तापाची
यावर कैसे बरे हसू मी

दुभत्या भाकड जित्राबांनां
खाटकास का विकू झुकू मी

जीवास देते जीव अश्या मम
लेखणीस का म्यान करू मी

सुजला सुफला देह संपदा
जमीन फुंकुन का टाकू मी

रत्नत्रयमय सत्य झळकता
मतास मिथ्या का कवळू मी

जपमाळेतिल स्फटिक मण्यांना
सरकवता काय आठवू मी

मेरु मुनींचा क्षमा भाव गुण
जाणुन का क्रोधात बुडू मी

मार्दव आर्जव स्वभाव असतो
कळण्या कुठवर आत खणू मी

सत्य धर्म शुचितेच्या नंतर
पुन्हा पुन्हा हे किती रटू मी

संयम धर्मी पुष्प सुगंधी
तपते धुपते दीप धूप मी

अष्टद्रव्य अन भाव अर्घ्य मम
कर्पुरारतितिल कापूर मी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.