काळ दवा आहे
काळ नवा आहे
वाज पुन्हा आता
काळ हवा आहे
पक्ष जरी पक्षी
काळ थवा आहे
भाकर भाजाया
काळ तवा आहे
प्रश्न नको पुन्हा
काळ हवा आहे
धान्य गहू साळी
काळ रवा आहे
बाष्प विणे झाडू
काळ जवा आहे
भाव फुले वाहू
काळ खवा आहे
पंचभुते मौनी
काळ दवा आहे
आत्मा सही साक्षी
काळ नवा आहे
जाण “सुनेत्रा” ला
काळ गवा आहे