तन भिजलेले वस्त्र सोवळे ऊन कोवळे सुखद गारवा
सुकवाया मन ऊन कोवळे ..ऊन कोवळे सुखद गारवा
चिंब भावना टपटपणाऱ्या शब्दांमधुनी झरझरणाऱ्या
काव्यसंपदा जलद सावळे ऊन कोवळे सुखद गारवा
जिनालयावर कळस तीन घन रत्नत्रय जणु अमूल्य हृदयी
धूत वस्त्र नव फिकट जांभळे ऊन कोवळे सुखद गारवा
नेत्रांवरती बांधुन पट्टी न्यायदेवता न्याय तोलते
जिनशासन पण नसे आंधळे ऊन कोवळे सुखद गारवा
काव्यपरीक्षक न्यायासन मधले अंतिम जनतेचे असते
धुंवाधार पाऊस कोसळे ऊन कोवळे सुखद गारवा