कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा
निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा
निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी
विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा
आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला
बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा
नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी
मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा
दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी
झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा