जिवंत वेडा – jivant veda (man living with supreme aim)


तरही गझल
गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची….

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल

जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात
नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल

सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार
पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल

पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे
कुणी डोळस खड्ड्यात त्या धडपडून मेला काल

पतंग होता आंधळा म्हणुन दिसले नाही त्याला
झेप घेऊन मेणबत्तीवर जळून मेला काल

शब्द वाटतात थर्डक्लास ऐसा मूळ दृष्टिकोन
फर्स्ट क्लास डब्यात नासक्या गुदमरून मेला काल

सेकंड क्लासचा डबा छान आठवणींचे द्रावण
पुण्यवान प्राणी त्याच्यात विरघळून मेला काल

गझल मात्रावृत्त (मात्रा २८)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.