Zaroke(झरोके) means small windows.
उघडून दाव त्यांना गीतातले झरोके
झाकू नकोस आता हृदयातले झरोके
तोडेन तारकांना दिवसा उजेड असता
उल्केस दावण्या मी गगनातले झरोके
या माणसातसुद्धा असती लबाड कोल्हे
शोधा तुम्ही तयांच्या डोळ्यातले झरोके
अलवार गझल माझी हलकेच कंप पावे
श्वासातुनी खुलावे शब्दातले झरोके
पाण्यात पेटलेले प्रतिबिंब हासणारे
तव लोचने ‘सुनेत्रा’ बिंबातले झरोके
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.