झुरळ – ZURAL (COCKROACH)


आषाढ प्रीत येई भेटीस श्रावणात
आषाढ रत्न येई भेटीस श्रावणात

पाण्यात पाहिलेल्या बिंबास चुम्बण्यास
आषाढ दूत येई भेटीस श्रावणात

फाडून जाल माया गेली तळ्यात खोल
आषाढ भाव येई भेटीस श्रावणात

वारा सुसाट उधळे रानात रंग गंध
आषाढ दाम येई भेटीस श्रावणात

शंखास फुंकण्या मी आहे स्वतः समर्थ
आषाढ श्वास येई भेटीस श्रावणात

दुथडी भरून कृष्णा जेंव्हा वळेल गोल
आषाढ लूट येई भेटीस श्रावणात

म्हणता कुणी नदीला आहे अनाथ पोर
आषाढ बाप येई भेटीस श्रावणात

वेगात धावणाऱ्या दुहितेस पूर लोट
आषाढ शांत येई भेटीस श्रावणात

सत्यावरी कधी जर संतापतील संत
आषाढ शुद्ध येई भेटीस श्रावणात

धडकावयास हृदये भरते उधार श्वास
आषाढ यंत्र येई भेटीस श्रावणात

जिनबिम्ब हृदयगर्भी अरिहंत देव सिद्ध
आषाढ माय येई भेटीस श्रावणात

धो धो किती लिहावे थांबून सांग तूच
आषाढ रोख येई भेटीस श्रावणात

नावात सत्यवादी पण बोलती असत्य
आषाढ ढोल येई भेटीस श्रावणात

मम सहज बाज आहे पाहू नकाच अंत
आषाढ मोक्ष येई भेटीस श्रावणात

सत्ता जिना गणांची संधी भल्याभल्यांस
आषाढ ठोक येई भेटीस श्रावणात

कर बेरजा पटापट मोजू नकोस शेर
आषाढ मूळ येई भेटीस श्रावणात

गमजा कशास इतक्या नीती फळे कुटील
आषाढ चोप येई भेटीस श्रावणात

का वेगळेपणाच्या हौशीत डामडौल
आषाढ सोंग येई भेटीस श्रावणात

लागून राहिलेला पाऊस ओढतोय
आषाढ मोट येई भेटीस श्रावणात

हळुवार वळण घेता मेट्रो रुळावरून
आषाढ गार्ड येई भेटीस श्रावणात

शांती मणी विसावे शतकातला प्रयोग
आषाढ मौन येई भेटीस श्रावणात

भारी पडेल पंगा कानात सांग बात
आषाढ वांड येई भेटीस श्रावणात

सांभाळ बोलचाली दारी गटार बांध
आषाढ झुरळ येई भेटीस श्रावणात

ना रोग रंग कुठला उरला तनामनात
आषाढ पुण्य येई भेटीस श्रावणात

चोरासमान वेडे घुसशील जर घरात
आषाढ डांग येई भेटीस श्रावणात

ताजा हिना पिपाणी रंगून शर कमान
आषाढ ब्रह्म येई भेटीस श्रावणात

उद्वाहनात पंखा फिरवीत गोल गोल
आषाढ हूड येई भेटीस श्रावणात

वाजव नळी पिपेरी होऊन जेरबंद
आषाढ नीर येई भेटीस श्रावणात

पणती करे खुशीने चुलतीस ज्ञान दान
आषाढ चरित येई भेटीस श्रावणात

माश्यांस खास गप्पी गप्पांत खारवून
आषाढ गप्प येई भेटीस श्रावणात

माझ्या घरी सुनेत्रा शिरकाव लीलया न
आषाढ मित्र येई भेटीस श्रावणात

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.