अस्तित्त्वावर श्रद्धा ठाम
निश्चय व्यवहाराचा साम
मम तत्त्वांची हृदयी ढाल
जीव लेखणी करते काम
स्वाध्यायाचा मज आधार
अंतर्यामी आत्माराम
गृहस्थाश्रमी संसारात
कर दोन्ही प्रिय उजवा वाम
नऊ रसांचा घेउन स्वाद
शांत रसाचा सांडे जाम
जिनबिंबाची सुंदरता
सत्य शिवाचे मंदिर धाम
गुणानुरागी जिनधर्मात
लीन सुनेत्रा पूर्ण विराम