बळद – BALAD


सारे जिनालयावर परतून जलद आले
ओतावयास घागर घन कृष्ण सुखद आले

सांगू कसे कुणाला जिनधर्म अर्थ महती
जाणून तेच घेण्या क्षेत्रास वरद आले

बघ शीत झुळुक आली भरण्या सुगंध देही
आभाळ सावळे पण होऊन गडद आले

आता कसे मिळावे त्या पारध्यास सावज
फासे पटावरीचे ठोकून नरद आले

ती फौज व्यंतरांची करण्या शिकार येता
भूमीत गडप करण्या वेगात बळद आले

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.