नाटक – NATAK (DRAMA)


जशास तैसे देते परतून ही तर माझी उपजत शक्ती
सहज लावते नाटक उडवून ही तर माझी उपजत शक्ती

मणी मोजुनी मनी लगावून लगावलीला शेर प्रकटतो
ना मी बोले काही ठरवून ही तर माझी उपजत शक्ती

काय साधते ऐसे बोलून खोटेनाटे नात्यांमध्ये
धर्म अहिंसा पाळे जगवून ही तर माझी उपजत शक्ती

आटापीटा करून जिवाचा नकाच पोसू दुबळेपण हे
ठाम उभी मी वाटा अडवून ही तर माझी उपजत शक्ती

अंधरुढींच्या बाजारातील बळी न बनवे कुणा सुनेत्रा
असल्या रीती टाके उलथून ही तर माझी उपजत शक्ती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.