भीत नाय मी कुणास – BHEET NAAY MEE KUNAAS (“I am not afraid of anyone”)


सोक्ष मोक्ष लावण्यास भीत नाय मी कुणास
पूर्ण सत्य सांगण्यास भीत नाय मी कुणास

लोटुनी पुरात नाव लाट पोट फाडण्यास
भोवऱ्यास भेदण्यास भीत नाय मी कुणास

कुंडल्या बनावटी करून कैक छापतात
त्या चुलीत जाळण्यास भीत नाय मी कुणास

माझियात मनुज देव हडळ भूत राक्षसीण
हे त्रिवार बोलण्यास भीत नाय मी कुणास

मंगळात आगडोंब सांगता कुणी उगाच
मंगळास चुंबण्यास भीत नाय मी कुणास

वृत्त – गा ल गा ल,  गा ल गा ल,  गा ल गा ल,  गा ल गा ल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.