आचरणाने कर्म साधना
स्वाध्यायाचे मर्म साधना
धन्य धन्य ते मनन चिंतन
लेखणीतून धर्म साधना
झरझरत्या शब्दांतुन शोधन
बोट ठेवण्या वर्म साधना
ध्यानाग्नीने पाप जाळण्या
तपवुन देहा नर्म साधना
कष्टाची भाकरी खावया
चुलीपुढे मम घर्म साधना
नको नको ते तसले चष्मे
करावयास अधर्म साधना
जीटी बीटी मारायाला
जागुन रात अकर्म साधना
तारीख महिना अगले साल
मायाजाली गर्म साधना
कोण माजली जाण ब्रोकरा
ओळख आता बर्म साधना
गझल सुनेत्रा दहा शेर युत
उजळवणारी चर्म साधना