माधुर्य चंद्रम्याचे किरणांत पारिजात
अरिहंत देव प्रतिमा पुष्पात पारिजात
फुलला सुवर्ण चाफा झेंडू गुलाब बूच
मृदगंध बकुळ प्राशे परसात पारिजात
मम माय धार काढे चरवीत दुग्ध धार
घन रास माणकांची लक्षात पारिजात
पाऊसधार गाते गातोय कल्पवृक्ष
मोती नि पोवळ्यांचा हस्तात पारिजात
जास्वंद कुंडलांची डुलतेय माळ सिद्ध
ताठ्यात गुलछडीसम बहरात पारिजात